Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कामेरीत एकाच रात्रीत ५ घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार टोळीचा म्होरक्या जेरबंद;१०,६७,५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत : एलसीबीची कारवाई

कामेरीत एकाच रात्रीत ५ घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार टोळीचा म्होरक्या जेरबंद;
१०,६७,५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत : एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामेरी गावात एकाच रात्रीत पाच घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करून जेरबंद केले आहे. कामेरी गावातील संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले यांच्या घरातील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली होती.

या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक संयुक्त पथक तयार केले होते. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पाचवा मैल चौक येथून संशयित आरोपी प्रवीण राजा शिंदे याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये दोन कटावण्या, २०० रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १०,६७,५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चौकशीमध्ये त्याने आपल्या इतर दोन साथीदारांसह मिळून कामेरी येथे बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

 या गुन्ह्यात आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे हे दोन परागंदा आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपी प्रवीण राजा शिंदे आणि त्याच्या साथीदारांवर सातारा व सांगली जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हाजर केले असता त्यास १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे करत आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक राजेंद्र यादव, सहा. निरीक्षक हरीश्चंद्र गावडे, संदिप गुरव, उदयसिंह माळी, अरूण पाटील, मच्छींद्र बर्डे, संदिप पाटील, मोतीराम खोत, सुरज थोरात, रोहन घस्ते, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, अभिजीत माळकर, विनायक सनदी, विनायक सुतार. अमर नरळे, ईश्वरपुर पोलीस ठाण्याचे कुबेर खोत, दिपक घस्ते, अमोल सावंत, विशाल पांगे, शशीकांत शिंदे. सायबर ठाण्याचे करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.