टायगर श्रॉफ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट ! थेट ड्रायव्हरने.. गोळीबाराचं कोडं उलगडणार
मुंबई : खरा पंचनामा
प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारातून टायगर थोडक्यात बचावला आहे. परंतु गोळीबारात जखमी झालेल्या टायगरला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्याच्यावर तिघांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात आलं आहे. हल्ल्याची जबाबादारी बिश्नोई गँगने घेतली आहे. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टायगरची घरी जाऊन विचारपूस केली. या गोळीबारामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर सिनेकलाकार घाबरून गेले आहेत. गोळीबारानंतर पोलीस देखील अॅक्शनमोडमध्ये आहेत. टायगर श्रॉफच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जुहू पोलिसांकडून टायगर श्रॉफ याच्या ड्रायव्हरकडून जबाब घ्यायला सुरुवात केली आहे. हत्येचा प्रयत्न, गुन्ह्याचा कट रचणे, शस्त्र कायदा अशा भारतीय न्याय संहितेच्या कलमअंतर्गत गुन्हा नोंदवायला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरील 2 साक्षीदारांचाही जबाब पोलीस नोंदवत आहेत. या गोळीबारात उमेश चव्हाण नावाचा व्यक्ती जखमी झाली आहे. त्याच्या छातीवर गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सलमान खानसोबत काम करत असल्याने गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीने केला आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झालं आहे. टायगर श्रॉफवर हल्ल्या झाल्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे हे भेटण्यासाठी गेले. टायगर हा सध्या कार्टर रोडच्या घरी आहे. टायगरच्या घराखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चालकावर गोळीबार झाल्यानंतर टायगरने काय केलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पहिल्यांदा गोळीबार केला. त्या गोळीबारात टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला.
त्यानंतर पुढील क्षणात टायगरने ड्रायव्हरला दुसऱ्या सीटवर शिप्ट केलं. त्यानंतर स्वतः गाडी चालवण्यास घेतली. त्यानंतरही पुन्हा गोळीबार झाला. त्याच्यावर तब्बल 10 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. पोलिसांकडून जलदगतीने कारवाईला सुरुवात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.