'किंगमेकर' मुख्यमंत्री इंडिया आघाडीत सामील, या राज्यातील सत्ताधारी पक्षाचा सर्वात मोठा निर्णय
चेन्नई : खरा पंचनामा
यावर्षी देशाच्या राजकारणाने एक वेगळं चित्र पाहिलं. तामिळनाडूमध्ये थलापती विजयच्या पक्षाने न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय मिळवला. निवडणुका जिंकल्यानंतर अभिनेता विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण आता त्यांचा पक्ष टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेट्री कळघम हा INDIA आघाडीत सहभागी झाला आहे. तमिळनाडू काँग्रेस अध्यक्ष मणिक्कम टागोर यांनी यापूर्वीच याबद्दल माहिती दिली होती.
त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीला नवा सहकारी मिळाला असून अभिनेते विजय यांच्या नेतृत्वातील TVK हा पक्ष INDIA आघाडीत अधिकृतपणे सहभागी झाला आहे. TVKच्या INDIA आघाडीतील प्रवेशामुळे तमिळनाडूत आघाडी अधिक मजबूत होणार असल्याच वक्तव्य मणिक्कम केलं आहे. CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हास्तरावर आंदोलन करण्याचा INDIA आघाडीचा निर्णय झालेला आहे. १५ ऑक्टोबरला चेन्नईत INDIA आघाडीतील सर्व ७ पक्षांचे जिल्हास्तरीय आंदोलन होणार आहे. या सगळ्य आंदोलनांना TVK चा पाठिंबा असून त्यामध्ये पक्ष आता पूर्ण ताकदीने प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. पक्षाच्या समावेशाचा ठरावही सर्वांच्या समंतीने मंजूर झाल्याची माहितीही समोर आली आहे, याबद्दलचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालात अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे. आपल्या पहिल्याच निवडणुकीत टीव्हीके (TVK) हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. एकूण २३४ जागांपैकी TVK पक्षाने १०८ जागा जिंकल्या. पण ते बहुमताच्या आकड्यापासून (११८ जागा) फक्त १० जागा दूर राहिले आणि राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतक बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती. यावेळी त्यांच्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्ष धावून गेले. त्यांनी दिलेल्या याच पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने विधानसभेतील बहुमत चाचणी सहज पार केली आणि विजय मुख्यंत्री म्हणून सध्या राज्याचा कारभार हाकत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.