स्टेजवर आले बोलायला सुरूवात केली आणि पहिल्याच वाक्यात राज ठाकरे यांनी सभा जिंकली..
मुंबई : खरा पंचनामा
आज मुंबईत ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा काढला. मतदार यादीतील कथित घोळाच्या संदर्भात सत्याचा एल्गार पुकारण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून हा मोर्चा निघाला.
मुंबई महापालितकेजवळ हा मोर्चा धडकला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला. या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार टीका निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमाकर यांच्यावर केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, अरे त्या ज्ञानेश कुमार याची काय तोंड लावली. ती अगोदर काढा... आपण चांगले आहोत. चांगल्या लोकांचे चेहरे लावालेत तोंडावर. आजचा मोर्चा कशासाठी आहे हे सर्वांना माहिती आहे.
2017-2018 पासून तुम्हाला हा राज ठाकरे सांगत आला की, याच्यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. ज्याप्रकारे निवडणूक आयोग आणि मतदान यादांमध्ये जो घोळ आहे, त्यावर बोलत होतो. त्यावेळीच मी सांगतो होतो की, निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याशिवाय दुध का दुध पाणी का पाणी होणार नाही.
हे मी 2017- 2018 पासून सांगतोय की, भारतीय जनता पार्टीचे मत अशी वाढूच शकत नाहीत. इथे जयंत पाटील बसले. त्यावेळी सर्वजण होते, सुरूवातीला त्यांनी हो म्हटले. आता त्यांना समजत आहे की, त्यांना काय सांगत होतो. संपूर्ण बहुमत असे होऊच शकत नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंना मत मिळाली. राज्यात पूर्ण सन्नाटा असा कोणता विजय असतो.
पूर्ण राज्यात लोकांमध्ये उत्साह नाही काही नाही. संपूर्ण बहुतम महायुतीला होते, सर्व सन्नाटा होता. राज्यात दणादण मतदार वाढतंय. 40 ते 60 लाख वाढले. आता सगळ्या गोष्टी उघड झाली आहेत. 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार वाढले. आम्हाला कुठला राग नाही की, तुम्ही सत्तेत बसला आहात. या देशातील मतदारांनी ठरवावे की, कोणाला सत्तेवर बसवावे. भाजपाने 2 कोटी लोक मतदार यादीतून बाहेर काढली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.