Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीमध्ये पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षासांगली सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

सांगलीमध्ये पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा
सांगली सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित पत्नी खून प्रकरणाचा निकाल लागला असून, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. काकडे यांनी आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कुमार भीमराव जाधव (वय ३८, सध्या रा. बामणोळी दत्तनगर, ता. मिरज, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्या दोषी पतीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. मयत सुनंदा कुमार जाधव (वय ३०) आणि आरोपी कुमार जाधव यांना तीन मुली असून मुलगा होत नाही या कारणातून तसेच वडीलांकडून आणखी पैशांची मागणी करण्यासाठी आरोपी पतीकडून पत्नीचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. याच कारणातून झालेल्या वादातून आरोपीने संताप येऊन पत्नी सुनंदा हिच्या डोक्यात बांबूने निर्घृणपणे मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावली. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयाचा निकाल व शिक्षा
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी कुमार भीमराव जाधव याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२ नुसार खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ४९८-अ नुसार (विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी) ३ वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली असून दोन्ही मुख्य शिक्षा एकाच वेळी (संचलित) भोगल्या जातील.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी बाजू मांडली, तर पोलीस यंत्रणेकडून तपासाधिकारी व पैरवी अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.