मुंबई : खरा पंचनामा
वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणारे बुलढाण्यातली शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच शेतकऱ्यांबाबत बोलताना एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले असून आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना 25 हजार सायकली दिल्या जात आहेत. दसरा मेळाव्यात शिवसेनेने 100 ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवले आहे. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले. शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.
शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत शिंदे संजय गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर उद्विग्न प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्व मिळून त्याची मदत करू. असा सल्लाही आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिलाय. शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या मौतीवरही (संस्कारालाही) कुणी जाऊ नये, असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
