शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण शिंदे की ठाकरेंचा ? सरन्यायाधीशांनी सांगितलेला 30 ऑक्टोबरचा मुहूर्त टळला; सुप्रीम कोर्टानं दिली आता नवी तारीख
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरु आहे. गेल्या आठवडाभरात युक्तिवाद झाला नव्हता. त्यामुळे या आठवडाभरात सलग सुनावणी होणार होती.
बुधवारी सुनावणीवेळी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी संघटनात्मक रचनेतील निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस व्हीप, पक्षांतर्गत निवडणुकांवरून त्यांनी घेरले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, गुरुवारी होणारी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी टळली. आता पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार असून यावेळेस ध्रुव मेहता हे बाजू मांडणार आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी सुरु आहे. यापूर्वी बोलताना सरन्यायाधीशांनी 30 ऑक्टोबरपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागेल असे सांगितले होते. मात्र, हा मुहूर्त टळला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी नवी तारीख दिली आहे. गुरुवारी कोर्टात ध्रुव मेहता हे आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्णयावर युक्तिवाद करणार होते. मात्र, गुरुवारी कोर्टात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिबबल यांनी बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकिल नीरज कौल यांनी देखील जोरदार बाजू मांडली. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. त्यामुळे आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
