मुंबई : खरा पंचनामा
टायगर श्रॉफगोळीबार प्रकरणात सोनीपत येथून अमन नावाच्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुणाल नावाच्या आरोपीने अमनच्या बँक खात्यात ५०,००० रुपये पाठवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.
या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. कुणाल हा याच प्रकरणातील अटक झालेला आरोपी आहे.
हरियाणामधील क्राईम युनिटला अमनच्या खात्यात पैसे आल्याची माहिती मिळाली होती. एएसआय वीरपाल यांच्या पथकाने हरियाणातील रोहणा गावातील रहिवासी असलेल्या अमनला अटक केली.
रोहणा येथीलच कुणाल या आरोपीने त्याच्या खात्यात ५० हजार रुपये ट्रान्सफर केल्याचं उघड झालं असून, त्याशिवाय इतर काही खात्यांवरूनही प्रत्येकी ५,००० रुपये ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं आहे. टायगर श्रॉफ प्रकरणातून आतापर्यंत रोहणा गावातूनच ४ तरुणांना अटक करण्यात आली आहे. अमनला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी अमनला आपल्या ताब्यात घेण्यासाठी आणि पुढील चौकशीकरिता त्याला मुंबईत आणण्यासाठी सोनीपत गाठलं आहे.
तज्ज्ञ अधिकारी या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांविषयी त्याची कसून चौकशी करतील, तसेच गोळीबारामध्ये त्याच्या नेमक्या सहभागाचीही पडताळणी केली जाईल.
या प्रकरणातील ११ आरोपींना मुंबईतील 'महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट' (MCOCA) अंतर्गत एका विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथे क्राइम ब्रांचने पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मागितली. पोलिसांकडून न्यायालयात माहिती देण्यात आली की, आरोपींमधील परस्पर संभाषणाचे अनेक डिजिटल पुरावे हाती लागले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
