Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

भारतीय रेल्वे तिकीट दर आणि प्रणालीत बदल करण्याचा विचार करत आहे. भारताची रेल्वे प्रणाली मोठ्या पुनर्रचनेसाठी सज्ज झाली आहे. अनेक दशकांपासून चालत आलेली पारंपरिक तिकीट दरांची रचना आणि फ्लेक्सी-फेअर प्रणालीमध्ये बदल करण्याची भारतीय रेल्वेची तयारी असल्याचे वृत्त आहे.

डायनॅमिक सर्ज कॅप आणि लवचिक भाडे धोरणाचा नवीन प्रस्ताव विचाराधीन आहे. याअंतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर रेल्वे तिकिटांचे दर आपोआप ठरवले जाणार आहेत. मात्र, अंतिम निर्णय केव्हा घेतला जाईल, त्यातील तरतुदी नेमक्या काय असतील?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऐन हंगामात, सणासुदीच्या काळात मूळ तिकीट दरावर २५ टक्क्यांपर्यंत वाढीव दराची मर्यादा असेल. त्याच वेळी, कमी मागणी असलेल्या मार्गावरील प्रवाशांना १० ते २५ टक्क्यांची सरळ सवलत देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या दुहेरी तिकीट दर प्रणालीमुळे कमी बजेट असलेल्या प्रवाशांना परवडणारी तिकिटे उपलब्ध होऊ शकतील, असा दावा करण्यात आला आहे.

तसेच कमी प्रवासी असलेल्या ट्रेनमधील जागांची वाढलेली मागणी रेल्वे महसुलासाठी उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जात आहे. या नवीन धोरणानुसार, सण किंवा ऐन हंगामात मूळ तिकीट दरावर २५ टक्क्यांपर्यंत कमाल मर्यादा (सर्ज कॅप) लागू केली जाईल. यामुळे प्रवाशांकडून अवाजवी दर आकारणी केली जाणार नाही.

ट्रेन चार्ट तयार होण्याच्या २४ ते ४८ तास आधी ट्रेनमधील ३० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिकाम्या राहिल्या तर सिस्टीममध्ये आपोआप मूळ तिकीट दरावर १० ते १५ टक्के सूट दिली जाऊ शकेल. याशिवाय, ऑफ-सीझनमध्ये किंवा ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने कमी असते, अशा मार्गांवर शेवटच्या क्षणी रिकाम्या जागा भरण्यासाठी तिकीट दरावर २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा प्रस्तावही आहे. विविध रेल्वे विभागांमधील प्रवासी वाहतुकीची माहिती आणि महसूल प्रारूपांचा अभ्यास केला जात आहे. रेल्वेचा दावा आहे की ऑफ-सीझनमध्ये २५ टक्क्यांपर्यंतची सवलत मध्यमवर्गीय, विद्यार्थी आणि कमी खर्चात प्रवास करणाऱ्यांना आकर्षित करेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.