सांगलीत वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबरला सलग १२ तास वाचन उपक्रमाचे आयोजन
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या 'वाचन प्रेरणा दिना'चे औचित्य साधून सांगली शहरात सलग १२ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ सांगली, वाचनप्रेमी वाचनालय, इनरव्हील क्लब ऑफ सांगली आणि संवादिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
हा उपक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सांगली येथील भिडे स्विमिंग टँक जवळ असणाऱ्या रोटरी हॉलमध्ये पार पडणार आहे.
या उपक्रमात सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असणार असून वाचनप्रेमींना ५ मिनिटांचे कथा वाचन करून आपला सहभाग नोंदवता येईल. त्याचप्रमाणे एक श्रोता म्हणूनही वाचकांना या कार्यक्रमात कितीही वेळ उपस्थित राहून वाचनाचा आनंद घेता येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ ही असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सुनंदा कदम (८४२१० ८४१६१) किंवा श्वेता चितळे (९४२२६ ७२७६०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.