Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"हल्लेखोर अर्धा तास थांबलेले, टायगर ज्या बाजूला बसला होता तिथेच गोळ्या झाडल्या अन्..."

"हल्लेखोर अर्धा तास थांबलेले, टायगर ज्या बाजूला बसला होता तिथेच गोळ्या झाडल्या अन्..."

मुंबई : खरा पंचनामा 

जुहू परिसरात रविवारी अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. फुटबॉल खेळून घरी परतत असताना टायगर श्रॉफच्या कारवर हल्लेखोरांनी ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावले. मात्र त्यांचा चालक जखमी झाला. या घटनेवेळी तिथे असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनी नेमकं काय घडले हे माध्यमांना सांगितले.

घटनेच्या वेळी तिथे टायगर श्रॉफचे फॅन शाहरूख शेख उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, टायगर फुटबॉल खेळायला आल्याचे मला कळले, त्यानंतर त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी मी तिथे थांबलो होतो. ३ हल्लेखोर होते. त्यातील एक दुचाकीवर बसला होता. २ जणांनी फायरिंग केली. हल्लेखोर दुचाकीवरून तिथून पसार झाले. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा टायगर श्रॉफ ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसला होता. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला असं त्याने सांगितले.

घटनास्थळाजवळ असलेल्या वडापाव स्टॉलवर अर्ध्या तासापासून हल्लेखोर उभे होते. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाले. गोळी झाडताच टायगर श्रॉफ कारमध्ये खाली वाकला, त्यामुळे तो बचावला. त्यांच्या कारमध्ये तिघे जण होते. जखमी वाहनचालकाला मागील बाजूस बसवल्यानंतर टायगर श्रॉफ स्वतः कार चालवून हॉस्पिटलला गेला असं प्रत्यक्षदर्शीनी म्हटलं. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता टायगर श्रॉफची भेट घेतली. टायगरच्या उजव्या हातावर गनपावडरमुळे भाजल्याचे निशाण आहे.

सलमा शेख नावाची एक व्लॉगर घटनेच्या ठिकाणी उपस्थित होती. टायगर इथे फुटबॉल खेळायला येतो. त्याचा खेळणं संध्याकाळी ७ वाजता संपते. आजसुद्धा असेच घडले. टायगर फुटबॉल खेळून बाहेर पडला आणि आपल्या कारमध्ये बसला. त्याची कार मुख्य रस्त्यावर पोहोचताच एका मुलाने गोळीबार केला. तो एक सडपातळ मुलगा होता. तो फटाके फोडत आहे असे सर्वांना वाटले. कार थांबली आणि त्याने गोळीबार सुरू केला. टायगर गाडीत सुखरूप आडवा झाला, पण ड्रायव्हरच्या कोपराला गोळी लागली. एक गोळी त्याच्या तळहाताला लागली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.