अंजली दमानियांचा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा! म्हणाल्या, ".छळ छळ छळत आहेत, मारत आहेत, वाह रे वाह"
मुंबई : खरा पंचनामा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या कुणाल नावाच्या सहकाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. खार सबवे परिसरात उबेर कॅब रोखून साध्या कपड्यातील पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भर रस्त्यात पोलिसांकडून गाडी रोखल्याचा आरोप
'सॉलिडेरिटी वॉक' मध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साध्या कपड्यात आलेले पोलीस अधिकारी त्यांना गाडीत घेऊन जाताना दिसत आहेत. या वेळी दमानिया आणि त्यांच्या सहकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची नावे आणि ओळखपत्र मागितले, परंतु अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा आणि मोठ्या वादानंतर तो परत दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 'कोणाला आणि का ताब्यात घेतले जात आहे, हे नागरिकांना कळायला नको का?' असा सवाल करत त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.
X पोस्टवरून दमानिया यांचा सरकार आणि पोलिसांवर निशाणा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सविस्तर माहिती देत अंजली दमानिया यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्याऐवजी पोलीस सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची टीका त्यांनी केली.
'महाराष्ट्राचे पोलीस कृष्णा आंधळे आणि अशोक खरात सारख्या बलात्काऱ्याच्या बायकोला शोधू शकत नाहीत, आपल्या देशातील पोलिस पुलवामातल्या हल्लेखोरांना शोधू शकले नाहीत, पण सामान्य नागरिकांना छळ छळ छळत आहेत.... मारत आहेत, झोडत आहेत. वाह रे वाह' असा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.