सांगली जिल्ह्यात पोलिसांतर्फे ऑक्टोबर महिना 'सायबर जनजागृती महिना' म्हणून साजरा होणार
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सध्याच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यासोबतच ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या डिजिटल युगात नागरिकांनी अधिक सतर्क, माहितीपूर्ण आणि सुरक्षित राहावे याकरिता इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C) व महाराष्ट्र सायबर यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा पोलीस दलाकडून ऑक्टोबर २०२६ हा महिना संपूर्ण जिल्ह्यामध्ये 'सायबर जनजागृती महिना' म्हणून साजरा करण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून थेट जनसंपर्कात येणारी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणारी व्यापक जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान सध्या घडत असलेल्या विविध प्रकारच्या सायबर फ्रॉडची माहिती नागरिकांना दिली जाणार असून, अशा फसवणुकीला कुणीही बळी पडू नये यासाठी संपूर्ण जिल्हाभरात सायबर साक्षरतेचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय, सांगली पोलीस दलाच्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरूनही सायबर सुरक्षेशी संबंधित विशेष माहितीपूर्ण पोस्ट प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
प्रत्येक नागरिकाने एक जबाबदार, सतर्क व सायबर सुरक्षित डिजिटल नागरिक होण्याची प्रतिज्ञा घेऊन या जनजागृती मोहिमेचा उद्देश यशस्वी करावा, असे आवाहन सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली बोबडे यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.