Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे पदवीधरसाठी शरद पवारांचा उमेदवार ठरला! साताऱ्यातील इच्छुकाचा पत्ता ऐनवेळी कट?

पुणे पदवीधरसाठी शरद पवारांचा उमेदवार ठरला! साताऱ्यातील इच्छुकाचा पत्ता ऐनवेळी कट?

पुणे : खरा पंचनामा 

पुणे पदवीधरमतदासंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भैय्या माने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगलीच्या हर्षदा जाधव-देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना मोठा ट्विस्ट आला आहे. भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पदवीधरमध्ये साताऱ्यातील इच्छुक उमेदवाराचा पत्ता कट होऊन कोल्हापुरातीलच उमेदवारांमध्ये लढत होणार का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, शिवाजीराव खांडेकर हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पुणे पदवीधर संघ हा महायुतीमध्ये भाजपमध्ये गेल्याने शरद लाड यांची उमेदवारी निश्चित समजले जात होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैया माने यांना थांबण्यास सांगितले होते. मात्र, मुश्रीफ गटाबरोबर काडीमोड घेत पदवीधरच्या मैदानात शड्डू ठोकणार असल्याची घोषणा केली.

इकडे भैया माने यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काल (रविवारी) ते दिवसभर पुण्यात होते. उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे देखील समजते. त्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची देखील पुण्यात भेट घेतली असल्याचे सांगितले जाते.

आज भैय्या माने यांच्या उमेदवारीची घोषणा महाविकास आघाडीकडून होणार का? याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, जर भैया माने यांच्या उमेदवारीची घोषणा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली तर पुन्हा एकदा सांगलीच्या इच्छुक उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.