Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून कारण अस्पष्ट : हल्लेखोर पसार

सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून 
कारण अस्पष्ट : हल्लेखोर पसार 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील गोकुळनगर येथे एका पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुणाचा धारदार शस्त्रानी वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. त्याच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तसेच हल्लेखोरांचीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गौरव सदानंद सर्जे (वय 25, रा. नवीन वसाहत सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी गौरव गोकुळनगर परिसरात थांबला होता. त्यावेळी हल्लेखोर तेथे आले. त्यांच्यात वाद झाल्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या चेहरा, पाठ, पोट आणि छातीवर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

गोकुळनगर येथे खून झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबाग तसेच एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. पंचनामा झाल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

खून का बदला खून?
मृत गौरव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल होते. काही महिन्यापूर्वी सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावर एका तरुणाचा खून करण्यात आला होता. त्यात गौरवचा भाऊ मुख्य संशयित आहे. त्यातून खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.