Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून घातक शस्त्रांचा साठा जप्त; दोन आरोपींना अटक

सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून घातक शस्त्रांचा साठा जप्त; दोन आरोपींना अटक

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे घातक शस्त्रांचा साठा बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. आरोपींकडून दोन लोखंडी तलवारी, दोन कोयते, दोन कट्यार, एक चाकू आणि एक कुकरी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांचे पथक विजयनगर परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान चाणक्य चौक ते रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन संशयित तरुण बेकायदेशीर शस्त्रांसह थांबल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार विक्रम खोत, दरीबा बंडगर आणि सतीश माने यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी संजीवनी मारुती मंदिराच्या अलीकडे, आकाश सायकल मार्टसमोर सापळा रचून राकेश ऊर्फ टक्या बसवराज वठार (वय २३) आणि दऱ्याप्पा पंडित दोडमणी (वय २३, दोघे रा. अष्टविनायक नगर, विजयनगर, सांगली) या दोघांना ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींच्या ताब्यातील पांढऱ्या कपड्यात व प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा मिळून आला. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्यारे आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजयनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत निशाणदार, सुभाष सुर्यवंशी, अनिल कोळेकर, दरीबा बंडगर, सागर लवटे, सतिश माने, अमिरशा फकीर, संदीप नलावडे, राजाराम मुळे, सागर टिंगरे, अमर नरळे, मोतीराम खोत, विक्रम खोत, विनायक सुतार, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.