युनुस शेख यांचा शिवसेना प्रवेश? नगरसेविका सहर शेख म्हणाली, शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी नाही !
ठाणे : खरा पंचनामा
ठाणे महानगरपालिका निवडणुकीतील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या गळ्यात शिवसेना पक्षाचे उरपणे असल्याने त्यांचा सेनेत प्रवेश झाल्याच्या जोरदार चर्चा झाल्या.
हिंदुत्ववादी शिवसेनेत मुंब्रा हिरवा करू अशी घोषणा दिलेले युनूस शेख कसे चालले? असा सवाल विरोधक विचारीत होते. याच पार्श्वभूमीवर युनुस शेख यांची लेक नगरसेवक सहर शेख हिने भाष्य केले आहे.
युनुस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतानाचा कथित फोटोही समोर आला. यामध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी युनुस शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना दिसत आहेत. युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सगळ्यानंतर झडलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सहर शेख हिने हिंदू मुस्लीम राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना शिवसेना पक्ष हिंदुत्त्ववादी पक्ष नाही, असे वक्तव्य केले.
हिंदू मुस्लीम राजकारण का केले जात आहे? शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, असे बोलले जाते. परंतु मला तसे अजिबात वाटत नाही. कारण आम्हाला तसे कधी कुणी जाणवू दिले नाही. जर तसे कुणी आम्हाला सांगितले असते तर मी तुमच्या मताशी सहमत झाले असते, असे सहर शेख म्हणाली.
सहर शेख हिने पूर्वीच्या भाषणांमध्ये आपल्याला येणार्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये शिंदेसेनेचा प्रामुख्याने मोठा वाटा राहिला. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेतच जर सहर शेख हिच्या वडिलांना मानाचे स्थान मिळत असेल तर या मागचे राजकारण काय आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.