Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिनेता दिनो मोरिया पोलिसांच्या ताब्यात, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

अभिनेता दिनो मोरिया पोलिसांच्या ताब्यात, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई : खरा पंचनामा 

बॉलिवूड अभिनेता दिनो मारिया याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता दिनो मारिया हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. दिनो मोरिया याचे नाव मिठी नदी सफाई आर्थिक घोटाळा आणि दिशा सालियान प्रकरणातही घेतले जात आहे. मिठी नदी प्रकरणात याआधी त्याची चौकशी झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांकडून दिनो मारिया याला अटक देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणात झाल्याची माहिती आहे.

२००५ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात साधारणपणे १३०० कोटी रुपयांहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. विशेषतः २०१९ ते २०२१ या कालावधीत सुमारे ६५ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला असून, त्यावर आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) तपास करत आहेत. ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

मिठी नदीतील गाळ उपशामध्ये १३०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या पथकानं प्राथमिक चौकशी केली आणि त्यामध्ये जी माहिती आणि पुरावे आढळले त्यावरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची चौकशी करण्यात आली आहे. दोघांनीही आर्थिक गैरव्यवहारात मुख्य आरोपी असलेल्या केतन कदम याच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधल्याचा संशय तपास संस्थांना आहे. या प्रकरणात तब्बल 65 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले आहेत. मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. ही खरेदी कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आली. मात्र, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून निधीचा गैरवापर केल्याचा ठपका आहे. तपासात या आरोपींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेला गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, विविध कंपन्यांचे संचालक, तसेच महापालिकेचे विद्यमान आणि माजी अधिकारी यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.