Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज ठाकरेंची दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान भलीमोठी पोस्ट; मोदी-शहांच्या जोडीला काय इशारा दिला?

राज ठाकरेंची दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान भलीमोठी पोस्ट; मोदी-शहांच्या जोडीला काय इशारा दिला?

मुंबई : खरा पंचनामा 

दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. परंतु आंदोलनाला परवानागी नसल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरवील यांनाही कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी टीका केली आहे.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी :- 'No nation can be grateful at the cost of its liberty' हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तहेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.

या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.

आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इतिहास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा.

आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि तो अबाधितच राहिला पाहिजे हे निश्चित !

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.