रेकॉर्डवरील आरोपी तेजस सावळवाडे १ वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार
विश्रामबाग पोलिसांची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी तेजस सुनील सावळवाडे याला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग मिरज यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (अ) नुसार दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेला आरोपी तेजस सुनील सावळवाडे (वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राजमती गर्ल्स हायस्कुल जवळ, नेमिनाथनगर, सांगली) याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा क्र. १२५/२०२२ तसेच नवीन भारतीय न्याय संहितेनुसार कलम २८१ अंतर्गत गुन्हा क्र. २५१/२०२५ आणि कलम १९८(१), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा क्र. ३३८/२०२५ दाखल असून हे गुन्हे सध्या न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत.
आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग यांच्याकडे पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला सांगली जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार त्याला आज जिल्ह्यातून बाहेर पाठवण्यात आले.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश माने, तसेच पोलीस अंमलदार अमर मोहिते, सचिन गायकवाड, इरफान पखाली, नरळे, बाळू मोरे, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर आणि सचिन घोडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.