Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांधी जयंतीनिमित्त सुरज फाउंडेशन आणि नव कृष्णा व्हॅली स्कूलतर्फे 'कृष्णा नदी स्वच्छता अभियाना'चे आयोजन

गांधी जयंतीनिमित्त सुरज फाउंडेशन आणि नव कृष्णा व्हॅली स्कूलतर्फे 'कृष्णा नदी स्वच्छता अभियाना'चे आयोजन

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

गांधी जयंतीचे औचित्य साधून सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीने येत्या २ ऑक्टोबर रोजी कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्वच्छ कृष्णा, सुंदर कृष्णा' हा मुख्य संकल्प उराशी बाळगून राबवल्या जाणाऱ्या या विशेष मोहिमेची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता होणार आहे. कृष्णा नदीकाठचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि संपूर्णपणे प्रदूषणमुक्त करणे हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे.

कृष्णा नदी ही आपल्या परिसराची मुख्य जीवनधारा असल्याने तिच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येणे अत्यंत गरजेचे आहे. या अभियानाअंतर्गत 'कचरा नको, घाण नको, कृष्णेला आता प्रदूषण नको' आणि 'हातात हात घेऊया, कृष्णेला निर्मळ बनवूया' अशा संदेशांसह नव कृष्णा व्हॅली स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक प्रत्यक्ष नदीकाठावर उतरून स्वच्छता करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या संकल्पनेला कृतीत आणत नदीपात्रातील कचरा गोळा करणे व स्वच्छतेबाबत समाजात जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य ध्यास आहे.

नदी संवर्धन आणि पर्यावरणाच्या जतन-संवर्धनासाठी आयोजित केलेल्या या लोकचळवळीत सर्व नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेच्या या कार्यात आपली साथ द्यावी, असे आवाहन सुरज फाउंडेशन आणि नव कृष्णा व्हॅली स्कूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.