Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत वेदांत बंडगर खून प्रकरणातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल चौगुले जेरबंदसांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत वेदांत बंडगर खून प्रकरणातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल चौगुले जेरबंद
सांगली एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील फरार आणि सराईत आरोपी विशाल बिरुदेव चौगुले याला जेरबंद केले आहे. संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत ११ जून २०२६ रोजी फिर्यादी यांच्या घरी खेळत असताना १४ वर्षीय वेदांत बंडगर याच्या डोळ्यात पिस्तुलाने गोळी झाडून खून करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यामध्ये मोक्का कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असून, या प्रकरणातील पसार असलेला आरोपी विशाल चौगुले हा खंडेराजुरी गावाकडून गुंडेवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर थांबल्याची गोपनीय माहिती सांगली एलसीबी पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचत संशयितरीत्या थांबलेल्या विशाल चौगुले याला पळून जाण्याची संधी न देता शिताफिने ताब्यात घेतले.

 चौकशी दरम्यान त्याने निलेश गडदे याच्यासह मिळून स्टेट बँक कॉलनीमधील घरी जाऊन वेदांत बंडगर याच्यावर गोळीबार करून खून केल्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वीच्या एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि उच्च न्यायालयात अपील केल्यामुळे तो जामिनावर मुक्त होता. या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. एलसीबीने या कारवाईत आरोपीला अटक करून पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून, मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे पुढील तपास करत आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सुभाष सुर्यवंशी, सपना गराडे, राजाराम मुळे, सुशिल मस्के, संदीप नलावडे, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, विनायक सुतार, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.