Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

CJP च्या दास, रांका यांची तिहार तुरुंगातून सुटका; अभिजीत दिपकेंची शाहरुख खानच्या व्हिडीओची पोस्ट चर्चेत

CJP च्या दास, रांका यांची तिहार तुरुंगातून सुटका; अभिजीत दिपकेंची शाहरुख खानच्या व्हिडीओची पोस्ट चर्चेत 

दिल्ली : खरा पंचनामा 

जंतर-मंतर येथील प्रतिबंधित आंदोलन क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी अटकेत असलेले 'कॉक्रोच जनता पार्टी'चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सात दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या कोठडी वाढवण्याच्या मागणीनंतरही विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांची सुटका करण्याचे आदेश बुधवारी दिले. 'द इंडियन एक्सप्रेस'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दास आणि रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याची विनंती दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. यावर झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही नेत्यांच्या वतीने जामीनदार सादर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांची मागणी फेटाळून लावत दोन्ही नेत्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.

१४ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश केल्याचा आणि शांतता भंगाचे बॉण्ड मोडल्याचा आरोप दास आणि रांका यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, सुरुवातीला त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती, ज्याची मुदत बुधवारी संपत होती.

दरम्यान, आज दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी आणि काही तक्रार असल्यास वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले होते.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. १० ऑक्टोबर रोजी शांतता राखण्याचे वैयक्तिक हमीपत्र दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ११ ऑक्टोबरला त्याचा भंग करण्यात आल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

जंतरमंतरसारख्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसून तिरंगा फडकावत पुन्हा आंदोलन केल्याचा आरोप सीजेपी नेत्यांवर आहे. यावर भाष्य करताना न्यायमूर्तीनी विचारले, 'जेव्हा तुम्ही दिलेल्या आश्वासनाचा स्वतःच भंग करता, तेव्हा तपास यंत्रणांनी तुमच्याकडून कठोर पुराव्यांची मागणी का करू नये?' तसेच, सत्र तुमच्याकडून कठोर पुराव्यांची मागणी का करू नये?' तसेच, सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असताना थेट उच्च न्यायालयात का आलात, असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला.

तिहार तुरुंगात अटकेत असलेले 'कॉक्रोच जनता पार्टी'चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सात दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. यानंतर अभिजीत दिपके यांनी केलेली X पोस्ट चर्चेत आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.