Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपा नेत्या, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे पतीही ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन करणार

भाजपा नेत्या, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे पतीही ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलन करणार



दिल्ली : खरा पंचनामा 

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात विरोधक आंदोलन करत आहेत. सीजेपी आणि काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढत असतानाच आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे पतीही या आंदोलनात उतरणार आहेत. अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर हे २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एसआयआर विरोधी आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्वतः परकला प्रभाकर यांनी आपल्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे.

१४ ऑक्टोबर रोजी स्थापन झालेल्या 'पीपल अगेन्स्ट एसआयआर' कडून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, दिव्यांगजन, ट्रान्सजेंडर आणि इतर लोकांनी मिळून हा गट स्थापन केला आहे.

या गटाकडून २३ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. लोकशाहीची पुर्नस्थापना आणि देशभरात सगळीकडे जंतर-मंतर सारखे आंदोलन करणे, हा या मोर्चाचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. 'हर हाथ तिरंगा, हर गली जंतर-मंतर' ही घोषणा या गटाकडून देण्यात आली आहे. प्रत्येक भारतीयाच्या हाती तिरंगा आणि प्रत्येक गल्लीत जंतर-मंतर करण्याचा मानस यातून व्यक्त करण्यात आला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, अभिनेते-कार्यकर्ते प्रकाश राज, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह परकला प्रभाकर एकाच मंचावर येतील. शेतकरी नेते राकेश टिकैत, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आएशी घोषही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्षांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरोधात खटला चालविण्यात यावा, तसेच विद्यमान एसआयआर प्रक्रियेला रद्दबातल करावे आणि डिलीट केलेल्या मतदारांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावे, अशाप्रकारची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

परकला प्रभाकर यांनी यापूर्वीही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केलेली आहे. नुकतेच त्यांनी एसआयआर प्रक्रियेवर आसूड ओढले. ही प्रक्रिया म्हणजे 'नागरिकांचा रक्तहीन राजकीय संहार' आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जर्मनी, रवांडा अशा देशांमध्ये जिथे धर्म, वांशिकता, भाषा किंवा वर्णावरून लोकांचा छळ केला गेला. त्याउलट भारतात लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून त्यांना लोकशाही प्रक्रियेच्या बाहेर फेकण्यात येत आहे.

परकला प्रभाकर यांच्यामते, एसआआयआर प्रक्रियेमुळे लोकांचा मतदानाचा हक्क हिरावला जात असून यामुळे देशात दोन प्रकारचे लोक निर्माण होत आहेत. एक ज्यांना मतदानाचा हक्क आहे आणि दुसरा म्हणजे ज्यांना मतदानाचा अधिकार नाही.

अर्थतज्ज्ञ असलेले परकला प्रभाकर हे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती असलेले परकला प्रभाकर यांनी यापूर्वीही अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली होती. भारतातील लोकशाही आणि सामाजिक घडामोडींवर ते नेहमीच अभ्यासू चर्चा किंवा भाष्य करत असतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.