दिल्ली एअरपोर्टवर पंजाबचे CM Bhagwant Mann यांना थेट ३ तास रोखले; ५० हजारांचा दंड का ठोठावला?
दिल्ली : खरा पंचनामा
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पॅरिसहून परतत असताना मंगळवारी रात्री उशिरा त्यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. हा दावा आम आदमी पक्षाने (AAP) केला आहे.
'आप'चे माध्यम प्रभारी बलतेज पन्नू यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पॅरिसला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
बलतेज पन्नू यांनी ही माहिती देताना केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "पंतप्रधान पंजाबी लोकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री भगवंत मान यांना रात्री दिल्ली विमानतळावर तीन तास ताब्यात घेण्यात आले होते. पंतप्रधानांनी नकार देऊनही ते न्यायालयाच्या आदेशानुसार पॅरिसला गेले होते, या नाराजीमुळे त्यांना ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता."
विमानतळावर नेमका काय प्रकार घडला? मुख्यमंत्री मान पॅरिसहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी सामान येत आहे, असे सांगून त्यांना तब्बल तीन तास थांबवून ठेवले. तीन तासांनंतर सामान गाडीत ठेवून मुख्यमंत्री निघण्याच्या तयारीत असतानाच विमानतळावर अधिकारी धावत मागे आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड नेमका कोणत्या कारणास्तव लावण्यात आला, याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले नाही, असा दावा पन्नू यांनी केला आहे.
वरिष्ठांच्या दबावाचा हवालासंबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःवर वरून प्रचंड दबाव असल्याचे मान्य केल्याचे सांगत, ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप 'आप'ने केला. बलतेज पन्नू यांनी सांगितले की, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या 'फूड फेस्टिव्हल'मध्ये (Food Festival) पंजाबचे प्रसिद्ध राजमा आणि पांढरे चणे यांसारखी कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यासाठी मुख्यमंत्री पॅरिसला गेले होते. केंद्र सरकारने सुरुवातीला या परदेश दौऱ्याला मंजुरी दिली नव्हती; अखेर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच मुख्यमंत्री पॅरिसला जाऊ शकले. परदेशात पोहोचल्यानंतर भारताच्या महावाणिज्य दूतावासातील एकही अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटायला आला नाही, यावरून केंद्राच्या उदासीनतेची पातळी स्पष्ट होते, असेही पन्नू म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
