Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागरिकांनी सर्वोच्च न्यायालय जाळलं. पोस्ट करून संजय राऊत गोत्यात; थेट FIR.

नागरिकांनी सर्वोच्च न्यायालय जाळलं. पोस्ट करून संजय राऊत गोत्यात; थेट FIR.

दिल्ली : खरा पंचनामा 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्याने वादंग निर्माण झाला आहे. राऊत यांनी अल्बानियातील सुप्रीम कोर्ट नागरिकांनी जाळल्याची पोस्ट केली आहे. भारताने अशा घटनांपासून धडा घेतला पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यावर वकील विनीत जिंदल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार करून राऊतांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. राऊत यांची टिप्पणी संवैधानिक संस्थांच्या विरोधात चिथावणी देणारी आहे. त्यामुळे या संस्थांना धोका निर्माण होऊ शकतो, असं विनीत जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

वकील विनीत जिंदल यांनी एक्सवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त आणि ज्वॉइंट कमिश्नर ऑफ पोलीस (इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन-IFSO) यांच्याकडे संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्याची जिंदल यांनी मागणी केली आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023च्या कलम 353(1)(b), 152, 196 आणि 197 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000च्या नियमानुसार राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी अल्बानियाच्या सुप्रीम कोर्टाला जाळण्यात आल्याची पोस्ट केली होती. तसेच भारतासहीत इतर देशांनी अशा घटनांमधून धडा घेतला पाहिजे, असं म्हटलं होतं. त्याविरोधात ही तक्रार करण्यात आल्याचं जिंदल यांनी म्हटलं आहे. संवैधानिक संस्थांच्या विरोधात कथितपणे हिंसा भडकवण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. शासन आणि न्यायिक संस्थांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण झालं पाहिजे, असंही जिंदाल यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी एक पोस्ट केली होती. त्यामुळे वाद निर्माण झालाय. अल्बानियात कथित भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आंदोलन झालं होतं. यावेळी सर्वोच्च न्यायालय जाळण्यात आलं होतं. या घटनेचा राऊतांनी त्यांच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालय कथितपणे भ्रष्ट पंतप्रधानांची मदत करत असल्याने आंदोलक नाराज होते. त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन केलं, असं या पोस्टमध्ये म्हटलंय. अल्बानियाच्या लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळलंय. आंदोलकांनी संसद आणि सरकारी कार्यालयांसोबतच मंत्र्यांच्या घरांवरही हल्ला चढवला आहे.

त्यामुळे सर्वच देशांनी अशा घटनांपासून धडा घेतला पाहिजे. खासकरून भारताने, असंही राऊत यांनी म्हटलंय.

राऊत यांच्या या पोस्टनंतर भाजपने राऊत यांना चांगलंच घेरलं आहे. राऊत यांचं हे विधान चिथावणी देणारं आहे. अराजकता निर्माण करणारं आहे, असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.