Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

SIR मधून नाव वगळलेल्या 13 कोटी मतदारांना दिलासा; विरोधकांच्या आंदोलनाचा धसका घेत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

SIR मधून नाव वगळलेल्या 13 कोटी मतदारांना दिलासा; विरोधकांच्या आंदोलनाचा धसका घेत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान (एसआयआर) 13 कोटीहून अधिक मतदारांची नावे प्रारुप मतदार यातीतून वगळण्यात आली आहे. याविरोधात इंडिया आघाडीने देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. याचा धसका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झालेल्या 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या अभियानांतर्गत वगळलेल्या मतदारांची ओळख पटवून त्यांना पुन्हा मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यासह नव्याने नोंदणीसाठीचा अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी वैध मतदारांना दिलासा मिळाला आहे. 'इंडियन एक्सप्रेस'ने याबाबत वृत्त दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.