लखनऊ : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशातील मतदार यादीतूनही कोट्यवधी हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आलं आहे. हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1.27 कोटी हिंदू मतदारांची नावे हटवण्यावरून चिंता व्यक्त केली आहे.
आयोगाच्या निर्णयानंतर भाजपने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 10 हजार ते 25 हजार मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा मानस ठेवला आहे. गायब मतदारांपैकी 40 ते 80 लाख मते समाविष्ट व्हावीत, यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणूक आयोगाकडून 20 नोव्हेंबरपासून एक अभियान राबवलं जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसानंतर 17 नोव्हेंबर रोजी एसआयआर नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध केलं जाणार आहे. त्यामुळे भाजपने पुढील एका महिन्यांसाठी मतदार यादीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि प्रभारींना महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष पकंज चौधरी उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत करून अभियान चालवलं जाणार आहे. भाजपच्या दाव्यानुसार, प्रत्येक मतदारसंघातील 31 हजारांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहे.
त्यामुळे भाजप प्रत्येक मतदारसंघातील 10 हजार ते 25 हजार पात्र मतदारांचं नाव पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा भाजपचा मानस आहे.
पक्षातील नेत्यांनी देखील बुथ पातळीवर मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर फॉर्म भरण्याचे देखील निर्देश दिले आहेत. एका नेत्याच्या दाव्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी कामाला शेवटची संधी असल्याचं कार्यकर्त्यांना म्हटलं. शेवटच्या एका महिन्यात चांगला लाभ घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षांपासून विधानसभा निवडणुकींमुळे घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी देखील प्रयत्न सुरु केले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
