मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुनील तटकरे यांच्यासहित इतर नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
अजितदादांसोबतच्या बैठकीत विलीनीकरणाचं तारीख ठरल्याचं सांगण्यात आलं आहे. या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या. दोन्ही नेत्यांमध्ये जळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जवळपास 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत पहिल्यांदा महाजेनको संदर्भात बैठक झाली. ऊर्जा विभागाबाबत ही बैठक होती. अनेक सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरूनही चर्चा झाल्याचे सांगण्यात आलं आहे.
कोणती राष्ट्रवादी ही कोणत्या राष्ट्रवादीत विलीन होणार, याचा एक आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला.
सुनेत्रा पवार गटातील नेते हे शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. 22 ते 26 आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकी संख्या महायुतीसाठी चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानोसा घेतल्याचे बोलले जात आहे. सर्व आमदारांची भूमिका काय आहे, तसेच काही सूचना फडणवीसांनी दिल्याचे सांगितलं जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नाही, अशी भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते सातत्याने विलीनीकरणावर भाष्य करत आहेत. सुनील तटकरे यांनीही अजितदादा विलीनीकरणासाठी इच्छुक होते, असे दावा काही दिवसांआधी केला. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख देखील सांगितली. तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची योग्य वेळ येईल, त्यावेळी सांगितलं जाईल, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. विलीनीकरणाची चर्चा ही एकतर्फी होत असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. अजितदादा गेला, त्यादिवशी आमच्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपल्याचे सुळेंनी स्पष्ट केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
