"अजितदादांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?", रोहित पवार 'या' दिवशी करणार खुलासा?
पुणे : खरा पंचनामा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात सातत्याने अनेक दावे करत चौकशी करण्याची मागणी केली. याचदरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केली आहे.
"अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?" असा थेट प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र त्यावर एका मफलरची प्रतिकृती छापण्यात आली आहे.
रोहित पवारांनी शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत भाष्य करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अद्यापही काही प्रश्न अनुत्तरित असल्याचा दावा करत, या अपघातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता नेमका कोण? अशी विचारणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या पोस्टरवर एका मफलरचे चित्र छापण्यात आले असून, यामुळे एका विशिष्ट नेत्याकडे निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कोणता 'राजकीय बॉम्ब' फुटणार, असा उल्लेखही या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता मफलरवाला नेता कोण आणि यामागे नेमके कोण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यापूर्वी देखील रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघात प्रकरणी 'व्हीएसआर' कंपनीला वाचवणारा 'मफलरवाला नेता' कोण, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी हा नेता अरविंद केजरीवाल किंवा छगन भुजबळ नसून दुसराच कोणीतरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.