Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सतेज पाटलांना कायद्यानेच वेसण घालणार, चंद्रकांतदादांचा एल्गार, खासगी शिक्षणसंस्थांसाठी सरकारची सर्वात मोठी स्ट्रॅटेजी ठरली!

सतेज पाटलांना कायद्यानेच वेसण घालणार, चंद्रकांतदादांचा एल्गार, खासगी शिक्षणसंस्थांसाठी सरकारची सर्वात मोठी स्ट्रॅटेजी ठरली!



मुंबई : खरा पंचनामा 

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून तापलेल्या राजकारणाचा परिणाम आता राज्याच्या राजकारणावर पडताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश द्यावेत, सतेज पाटलांचं साम्राज्य पाच मिनिटात उद्ध्वस्त करतो, अशी घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

त्याचाच पुनरुच्चार आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी केला. सतेज पाटील यांना कायद्यानेच वेसण घालणार, खासगी शिक्षणचालकांच्या मनमानी फी विरोधात कायदा आणणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकात पाटील हे एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' कार्यक्रमात बोलत होते.

गोकुळ निवडणुकीच्या दरम्यान आणि नंतर अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सतेज पाटील आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झाली. अध्यक्षपदी महायुतीचा संचालक बसल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर जाहीर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा, सतेज पाटलांचं साम्राज्य उद्ध्वस्त करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

'कॉफी विथ कौशिक' कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले की, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कोणी वाकडं बोललं तर सहन करणार नाही. त्यामुळेच सतेज पाटलांवर उद्ध्वस्त केल्याची टीका केली. खरं सांगायचं तर मी काही केलं नाही, सुप्रीम कोर्टानंच शिक्षण संस्थाचालकांची झोप उडवली. एका विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर कोर्टानं मोठी प्रश्नावली दिली आहे. त्यावर दिवाळी संपल्यानंतर उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठ चालकांची झोप उडणार आहे हे नक्की.

एफआरए कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून सतेज पाटील सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचे, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या मार्च महिन्यात एफआरए कायदा आणणार आहे. त्या माध्यमातून शिक्षणचालक विद्यार्थ्यांकडून जी फी घेतात त्यावर सरकारचे नियंत्रण असेल. कुठे मनमानी फी वसुली सुरू असेल तर त्यावर सरकार कारवाई करणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

डी वाय पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे समोर येईल, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना इशारा दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.