Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण हे दोन्ही पक्ष पुन्हा आल्यास ते नेमक्या कोणत्या राजकीय आघाडीत सहभागी होणार, इंडिया आघाडीत की महायुतीत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा दावा केला आहे. 'अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते,' असे लोंढे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पण त्याच वेळी, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे आलेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सांगितली जात आहे.

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात ज्या बाबींवर चर्चा झाली होती, त्या पुढे कशा न्यायच्या, यावर सध्या चर्चा अडल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. ही चर्चा तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे दीड तास सुरु होती. अशीही माहिती आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चावरही चर्चा झाली, असे सांहितले जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्बात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,' असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्यांनी विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळली नसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धक्कादायक दावा केला आहे सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आमदारांचे पक्षातील राजकीय घडामोडींमुळे मन उडाले असून ते पक्षाबाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार कधीही पक्ष सोडू शकतात. हे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.