Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईश्वरपूर येथील आरोपी कौस्तुभ कृष्णाराव सरनौबत यास जन्मठेपेची शिक्षा

ईश्वरपूर येथील आरोपी कौस्तुभ कृष्णाराव सरनौबत यास जन्मठेपेची शिक्षा

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

ईश्वरपूर येथील आरोपी कौस्तुभ कृष्णाराव सरनौबत याला पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला दोन मुली झाल्या व मुलगा झाला नाही, या कारणावरून त्याने हा राग मनात धरून पहाटे त्याच्या पत्नीस फिरायला जाण्याच्या बहाण्याने विहिरीत ढकलून खून केला होता. यानंतर पोलीस ठाण्यात अपघात झाल्याचा बनाव करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी फिर्यादी मिलिंद नानासो भोसले यांनी १८ सप्टेंबर २०२२ रोजी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार तपास अधिकारी पोउपनि शशिकांत चव्हाण यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या खटल्यात महाराष्ट्र शासनतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विशाल नरेंद्र बामणे यांनी काम पाहिले.

सदरची केस सत्र न्यायाधीश क्र. २ मा. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात चालली. न्यायालयाने दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार आरोपी कौस्तुभ कृष्णाराव सरनौबत याला जन्मठेपेची शिक्षा व ५००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास आणि कलम १७३ अन्वये ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी फिर्यादी मिलिंद नानासो सावंत भोसले, मेडिकल ऑफिसर डॉ. एम. एन. राऊत व तपासी अंमलदार श्री. शशिकांत चव्हाण यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कोणत्याही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावyच्या आधारे विशेष सरकारी वकील ॲड. विशाल नरेंद्र बामणे यांनी आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व समाजात न्यायव्यवस्थावरील विश्वास दृढ व्हावा असा युक्तिवाद केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.