Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर व ब्लोअर चोरणारा जेरबंदमिरज ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर व ब्लोअर चोरणारा जेरबंद
मिरज ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर व औषध फवारणीचा ब्लोअर चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य चोराला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका गुन्ह्याचा छडा लावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २३ व २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान, संतोषवाडी येथील शेतकरी फिर्यादी दिग्विजय काकासाहेब इंगवले यांच्या शेतातून ४,००,००० रुपये किमतीचा 'इस्कॉर्ट कुबोटा' कंपनीचा फार्मा ट्रॅक आणि ५०,००० रुपये किमतीचा 'सुपर ॲग्रो' कंपनीचा औषध फवारणीचा ब्लोअर अज्ञात इसमाने चोरून नेला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. 

यादरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, हा गुन्हा कर्नाटक राज्यातील तिकोटा येथील मेहबुब गौसमोडी सारवान (वय ३५) याने केल्याची निष्पन्न झाले.

वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस पथकाने तिकोटा येथे जाऊन सापळा रचून आरोपी मेहबुब सारवान याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने संतोषवाडी येथून ट्रॅक्टर व ब्लोअर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला ट्रॅक्टर व ब्लोअर असा एकूण ४,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत ओमासे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन पवार, कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.