Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण 



मुंबई : खरा पंचनामा 

एमएमआरडीएकडून अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेदरम्यान ७.३५ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत जोडमार्ग उभारला जात आहे. त्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे ६० ते ९० मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची वाहतूक वेगवान होणार आहे. 

अटल सेतूमुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधांचा विस्तार करणारा अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडून वाहतुकीतील प्रमुख अडथळे दूर करणे, वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत करणे हा एमएमआरडीएचा उद्देश आहे. पनवेल मुख्य जंक्शन परिसरात, वाहतुकीचा अतिरिक्त निर्माण होत आहे. या ठिकाणी अटल सेतूवरून येणारी वाहतूक प्रमुख महामार्गावरील वाहतुकीशी एकत्रित होते. ही समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीए ताण चिर्ले आणि पळस्पे विभागांतून स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग विकसित करत आहे. 

चिलें आणि पळस्पे या दोन्ही विभागांतील एकूण बांधखामाचा विचार करता ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या बांधकाम वेगाने सुरू असून, पाया, स्तंभ, गर्डर आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.