Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करतायत"; राहुल गांधींच्या आरोपाने खळबळ, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ

"पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करतायत"; राहुल गांधींच्या आरोपाने खळबळ, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

काँग्रेस आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'पंतप्रधान मोदी माझा फोन टॅप करत आहेत', असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. पण माझ्या फोनचं पंतप्रधान टॅपिंग करत आहेत. माझ्या फोनमध्ये विविध माहिती आणि पुरावे आहेत, जे सर्व आरोपांना पुष्टी देऊ शकतात.', असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 'पुरावा इथेच या फोनमध्ये आहे. पंतप्रधानांना हे माहीत आहे कारण त्यांनी माझा फोन टॅप केला आहे. जेव्हा ते समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, तेव्हा सर्वांसमोर हे स्पष्ट होईल की कोण परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम करतंय? खरा देशद्रोही कोण आहे आणि किती काळापासून देशद्रोहाच्या कामात सामील आहे. अशा अनेक गोष्टी ज्या मला माहीत आहेत आणि ज्या माझ्या फोनमध्ये आहेत', असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधींनी दुसऱ्या एका व्हिडीओत बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'जर पंतप्रधान मोदींनी माझ्याशी समोरासमोर खुली चर्चा केली, तर त्यानंतर ते पंतप्रधान पदावर राहू शकणार नाहीत', असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, "मला संसदेत मोकळेपणाने बोलू दिलं जात नाही. माझा माईक बंद केला जातो. कृषी विधेयक असेल, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा असेल किंवा एपस्टीनचा मुद्दा असेल अशा अनेक विषयांवर तुम्ही मला बोलताना पाहिलं असेल, पण मला बोलू दिलं नाही. मात्र, आता मला समोरासमोर चर्चा हवी आहे. दोन्ही नेत्यांनी भाषणं देण्याऐवजी एकमेकांना थेट प्रश्न विचारावेत आणि आव्हाने द्यावीत. माझी इच्छा आहे की नरेंद्र मोदी माझ्यावर आरोप करतील आणि मी त्यांच्यावर आरोप करेन. पण त्यांनी यावं, एक टेबल असेल, एका बाजूला मोदीजी असतील आणि दुसऱ्या बाजूला मी असेन. जर या चर्चेचे पंच म्हणून गौतम अदाणी किंवा मोहन भागवत यांची निवड केली तरी मला काहीही हरकत नाही. पण मी खात्री देतो की माझ्यासोबत समोरासमोर चर्चा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहू शकणार नाहीत", असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.