Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाई, जयकुमार गोरे विजयी; कोरेगावात मतांचा टाय झाल्याने ईश्वरचिठ्ठीचा थरार

सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाई, जयकुमार गोरे विजयी; कोरेगावात मतांचा टाय झाल्याने ईश्वरचिठ्ठीचा थरार 



सातारा : खरा पंचनामा 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून विविध तालुक्यांत धक्कादायक घडामोडी पाहायला मिळत आहेत. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला, तर मान तालुक्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एकतर्फी बाजी मारली आहे. दुसरीकडे, कोरेगाव सोसायटी गटात एका मताने मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असून दोन्ही उमेदवारांमध्ये समान मते झाल्याने निकाल आता थेट 'ईश्वरचिठ्ठी'वर अवलंबून असणार आहे. 

कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठा थरार रंगला. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांना ४५ मते मिळाली होती, तर भाजपचे सुनील खत्री यांच्या पारड्यात ४४ मते पडली होती. मात्र, फेरतपासणी दरम्यान सुनील माने यांचे एक मत अवैध ठरवण्यात आले. यामुळे दोघांचेही संख्याबळ प्रत्येकी ४४-४४ असे समसमान झाले. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही लढत बरोबरीत सुटल्याचे जाहीर केले असून, आता या जागेचा फैसला ईश्वरचिठ्ठी काढून केला जाणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ५८ मते मिळवत विजय मिळवला. 

भाजपचे विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना ४६ मते पडल्याने त्यांचा १२ मतांनी पराभव झाला. मान सोसायटी मतदारसंघ भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवून मोठा विजय संपादन केला. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४ मते तर शिवसेनेचे शेखर गोरे यांना अवघी ७ मते मिळाली. जावळी सोसायटी मतदारसंघ भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल गोळे यांना ८ मते मिळवता आली. 

खंडाळा सोसायटी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले यांनी २८ मते घेत विजय खेचून आणला. भाजपचे संजीव गाढवे यांना २१ मते मिळाली. महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली राजपुरे यांनी ८ मते मिळवून विजय मिळवला, तर शिवसेनेचे संजय मोरे यांना ४ मते मिळाली. 

इतर प्रवर्गांतील पहिल्या फेरीचे कल / निकाल औद्योगिक विणकर मतदारसंघ भाजपचे चंद्रकांत जाधव ७९ मते मिळवून विजयी झाले. अपक्ष सुनील वाघ यांना ७ मते मिळाली. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ (पहिली फेरी) शिवसेनेचे दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी पहिल्या फेरीत ६१८ मतांची प्रचंड आघाडी घेतली. अपक्ष उमेदवार सुरेश गायकवाड (१० मते), सत्यवान कांबळे (६ मते) आणि रवींद्र बडेकर (५ मते) पिछाडीवर आहेत. भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघ (पहिली फेरी) भाजपचे अर्जुन काळे यांनी पहिल्या फेरीत ३४९ मते मिळवत आघाडी घेतली आहे, तर अपक्ष सुनील वाघ यांना २८४ मते मिळाली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.