अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत पारनेरमधून खासदार नीलेश लंके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
नीलेश लंकेंना पाडण्यासाठी पारनेरमध्ये मोठी फिल्डिंग लावण्यात आली होती. भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी विखे पाटील कुटुंबांनी जोर लावला होता. यावेळी विखेंसोबत बाळासाहेब थोरातांची देखील ताकद होती. मात्र विखे सगळ्यांना पुरून उरले.
त्यांनी अहिल्यानंतर जिल्हा बँक निवडणूकीत मोठा विजय संपादन केला आहे.
निवडणुकीत विजयी होताच नीलेश लंके यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आपल्याला जिल्हा बँकेत येऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, ही निवडणूक सर्वसामान्यांच्या हातात असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं.
"जंगलात एकच सिंह असतो, तो म्हणजे निलेश लंके. माझा तालुका विकाऊ नाही. मी कोणालाही घाबरणार नाही. त्यामुळेच माझा विजय झाला," अशी आक्रमक प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली. नीलेश लंकेंच्या या वक्तव्यातून त्यांनी थेट विखे पाटील कुटुंबाला डिवचल्याची चर्चा आहे.
या निवडणुकीत लंके यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
