Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपाची केंद्रातील सत्ता जाणार, राज ठाकरे यांचं पहिल्यांदाच भाकीत; पोस्ट तुफान व्हायरल

भाजपाची केंद्रातील सत्ता जाणार, राज ठाकरे यांचं पहिल्यांदाच भाकीत; पोस्ट तुफान व्हायरल 



मुंबई : खरा पंचनामा 

भाजपची केंद्रातील सत्ता एप्रिलमध्ये जाणार आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात पाय उतार होतील... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान होणारच नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, त्यांना उपपंतप्रधानपद मिळणार आहे... अशी भाकीतं विरोधकांकडून वारंवार वर्तवली जात आहेत. त्यामुळे देशात मोठ्या घडामोडी होणार का? अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाबाबतचं भाकीत वर्तवलं आहे. 

राज ठाकरे यांचे अंदाज अचूक असतात, शिवाय ते ठोस माहिती असल्याशिवाय कोणतंही भाष्य करत नाहीत, त्यामुळेच राज यांच्या भाजपबाबतच्या या भविष्यवाणीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून हे भाकीत केलं आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी जेन झीच्या आंदोलनाचा संदर्भ दिला आहे. दिल्लीत झालेल्या जेन झीच्या आंदोलनानंतर भाजपचा केंद्रापासून राज्यांपर्यंत सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. हे लवकरच घडणार आहे, असं भाकीतच राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच हे विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

भाजप आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. सत्तेतून बाहेर फेकल्यावर गेल्या 14 वर्षात जे केलं, त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसणार आहेत. याचीच भाजप नेत्यांना भीती आहे, असं सांगतानाच अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच, असं सूचक विधानही राज ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी छठ पूजेच्या वादावरूनही भाजपला फटकारलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकणं भाजपला कठिण झालं आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपने छठ पूजेचा सापळा रचला आहे. निवडणूक हातातून जात असल्याचं लक्षात आल्यावर भाजप फोडा आणि राज्य कराची नीती वापरत असतो. त्यामुळे मनसैनिकांनी सावध राहा. 

भाजपच्या कोणत्याही डावाला बळी पडू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जमिनींपासून जंगलापर्यंत एकाच उद्योगपतीच्या घशात घालायचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात जे दिसेल ते त्या उद्योगपतीला दिलं जात आहे. आपल्यासमोर या घटना घडत आहेत. पण आपल्याला राग येत नाही. आपण याचा राग योग्यवेळी काढला पाहिजे. शांत बसून चालणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.