मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला बुधवारी सकाळी आग लागली. मंत्रालयासमोरील पावनगड या त्यांच्या बंगल्याला सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली व धुराचे प्रचंड लोट बंगल्यातून बाहेर येत होते.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटनात वाढ झाली आहे. त्यातच बुधवारी सकाळी थेट मंत्र्यांच्याच बंगल्याला आग लागली आहे.
मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले आहेत. त्यापैकी पावनगड या बंगल्याला सकाळी अचानक आग लागली.
बंगल्याच्या वातानुकूलित यंत्रणेतील दोषामुळे ही आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून विद्युत यंत्रणेतील दोषामुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. बंगल्याच्या परिसरात धुराचे साम्राज्या पसरले असून या दुर्घटनेत कोणाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, शासकीय बंगल्यातच विद्युत यंत्रणेतील दोषामुळे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
