कोल्हापूर : खरा पंचनामा
नुकतीच गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीला धक्का देत सत्ता मिळवली. मात्र निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता येऊनही अध्यक्षपद महायुतीकडे गेले. परंतु, या राजकीय राड्यामध्ये सतेज पाटील यांच्या एकाकी लढ्याची गल्ली ते दिल्ली सर्वत्र चर्चा झाली.
गोकुळची निवडणूक गाजवल्यानंतर चर्चेत आलेल्या सतेज पाटील यांच्यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते, विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यकडे काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकांसाठी अखिल भारतीय काँग्रेसने कमिटीने स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमध्ये सतेज पाटील यांनाही स्थान देण्यात आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
गोवा विधानसभा स्थापन केलेल्या या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी के. जे. जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली असून सतेज पाटील यांच्यासह खासदार शफी परंबिल यांनाही सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
या समितीच्या माध्यमातून सतेज पाटील यांची गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची छाननी आणि निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणार आहे.
उमेदवारांची लोकप्रियता, संघटनात्मक ताकद तसेच निवडणुकीबाबतची तयारी याबाबत ही समिती काम करणार असून यामाध्यमातूनच उमेदवार निवडले जाणार आहेत. या निवडीबद्दल सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचे आभार मानले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
