Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मोदी सरकारची मंजुरी ! लोकसभेच्या किती जागा वाढणार? विरोधकांची मागणी मान्य?

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मोदी सरकारची मंजुरी ! लोकसभेच्या किती जागा वाढणार? विरोधकांची मागणी मान्य?



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशन सत्राच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या प्रस्तावित अधिवेशनात केंद्र सरकार परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षणाशी संबंधित महत्त्वाचे विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे.

या अधिवेशनापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकातील प्रस्तावित बदलांना मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आगामी काळात लोकसभेच्या सध्याच्या जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच, या प्रस्तावित बदलांनुसार, नवीन जागांचे वाटप पुढील २५ वर्षांसाठी म्हणजेच २०५१ पर्यंत गोठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभेत ५० टक्के जागा वाढल्यास नव्या संसदेत लोकसभेच्या ५४३ जागांमध्ये वाढ होऊन ८१५ जागा होणार आहेत.

जवळपास ८ महिन्यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र, दोन तृतीयांश बहुमता अभावी हे विधेयक फेटाळले गेले. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, द्रमुक पक्षांनी ५० टक्के जागा वाढवण्याबाबत सकारात्मकता दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ५० टक्के जागांच्या वाढीमुळे जागा वाढल्या तरी राज्यांच्या प्रतिनिधीत्वावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा आहे.

विशेष अधिवेशनाकडे देशाचे लक्ष

केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात परिसीमन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेषतः लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची गरज असल्याने विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधला जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही या अधिवेशनासाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ३० नोव्हेंबरला सभागृहात हे विधेयक मांडले जाते का आणि त्यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.