Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

CM फडणवीसांच्या त्या निर्णयानंतर १२ तासांतच शिंदेसेनेने पंगा घेतला, कोणत्या कारणामुळे दादरचे नाव चैत्यभूमी करण्याला विरोध

CM फडणवीसांच्या त्या निर्णयानंतर १२ तासांतच शिंदेसेनेने पंगा घेतला, कोणत्या कारणामुळे दादरचे नाव चैत्यभूमी करण्याला विरोध 



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारकडून तत्वतः मान्यता मिळाली असून, येत्या विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयाला महायुतीत घटक पक्ष शिवसेनेनेच कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेते नेते शिशिर शिंदे यांनी 'भिकार भाजप' असा उल्लेख करून भाजपला मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसांमध्येच रस्त्यावर आपसांत संघर्ष घडवायचा आहे, असा हल्लाबोल केला. 

बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या नामकरणाचा डाव हाणून पाडला होता. १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन झाला आणि २४ तास उलटायच्या आतच भाजपने ही खेळी केली. हा खरा शिवसेनाप्रमुखांचा अपमान आहे, अशी भूमिका नामांतराला विरोध करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे. दादरचे नाव बदलून 'चैत्यभूमी' नामकरणाची उबळ या भिक्कार भाजपला आली. म्हणजे महऱ्हाठींमध्येच फूट पाडून भाजपला मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसांमध्येच आपसांत संघर्ष घडवून आणायचा आहे. मऱ्हाठी माणसांनी आपसात डोकी फोडली की आणि भाजप मनोमन खूष होऊन रेशीमबागेत नाचणार. 

महऱ्हाठी व्होटबँक फोडली म्हणून नाचणार. जोरदार पोलीस अॅक्शन होणार. पोलीस दडपशाहीने तुरुंगात महऱ्हाठीच तरुण जाणार. मराठी जणांचे भवितव्य पोलिसांच्या खुंटीवर टांगणार. मराठींच्या चांगल्या रोजगार संधी घालवणार. मराठी माणूस अशक्त होणार. मराठी शक्ती क्षीण होणार आणि परप्रांतीयप्रेमी भाजप मिठाई वाटणार, असे यांचे धोरण असल्याचे शिशिर शिंदे म्हणाले. महाराष्ट्र कमजोर करण्याच्या प्रयत्नात 'कुटील भाजपच; हद्दपार होईल हे भाजप थिंकटॅकने लक्षात घ्यावे, असा इशारा शिशिर शिंदे यांनी दिला आहे. शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला झाला आणि २४ तास उलटायच्या आतच भाजपने ही खेळी केली. हा खरा शिवसेनाप्रमुखांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दादरच्या नामकरणाचा डाव हाणून पाडला होता. 

आज बाळासाहेब' शरीराने भूतलावर नसतील पण जातीभेद पूर्ण गाडून बाळासाहेबांनी उभे केलेले मऱ्हाठी बांधव हा भाजपचा हलकट प्रयत्न हाणून पाडतील व भल्याभल्यांचे तोंड जमिनीवर आपटेल हे नक्की, असे शिशिर शिंदे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.