Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला



मुंबई : खरा पंचनामा

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यांच्या जामीनाला 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात  धाव घेतल दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. ती मुदत उद्या संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

सीबीआयच्या विनंती नुसार जामीन अंमलबजावणीसाठी 10 दिवस स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी सीबीआयनं परत वाढीव मुदत मागितली आहे. मात्र इथून पुढे कोणतीही विनंती मान्य करणार नसल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरूंगात होते. मध्यंतरीच्या काळात तुरूंगात त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर देशमुख यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.