Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जुने हिशेब चुकते होणार?

जुने हिशेब चुकते होणार?सांगली : खरा पंचनामा

खूप मोठे कार्यक्षेत्र असलेल्या भागासाठी नवे अधिकारी आले आहेत. कधीकाळी त्यांनी सांगलीतही काम केले होते. त्यावेळी त्या साहेबांना त्रास देणाऱ्यांना आता त्रास होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लोकांनी देव पाण्यात घातले आहेत असे बोलले जात आहे. 

नव्याने आलेल्या साहेबांना जिल्हा नवीन नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अनुभव घेतले आहेत. ते साहेब सांगलीत असताना त्यांच्याच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिला होता अशी चर्चा आता रंगली आहे. त्यांच्याशिवाय अन्य लोकांनीही त्यांना त्रास दिला होता असे आता खुलेआम बोलले जात आहे.

साहेब आता मोठ्या क्षेत्राचे प्रभारी म्हणून आले आहेत. त्यामुळे त्यांना त्रास देणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या साहेबांची वक्र दृष्टी आपल्यावर पडू नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. त्यामुळे भविष्यात कोणावर कारवाईची टांगती तलवार राहणार याची विशेष चर्चा त्या विभागात केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.