सिबीएससीच्या तीन शाळा बोगस!
पुणे : खरा पंचनामा
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत. या तिन्ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे. एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे.
बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे.
या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली लावावे जेणे करुन ज्यांची मान्यता आहे त्यांची मान्यता समोर येईल. आणि ज्यांची मान्यता नसेल ते देखील समोर येणार असल्याचं यावेळी उकिरडे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.