Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाबळेश्वर येथे बोलेरो गेली थेट दरीत!

महाबळेश्वर येथे बोलेरो गेली थेट दरीत!



सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील तापोळा रस्त्यावरील चिखली शेडजवळ बोलेरो जीपचा ब्रेक फेल  होऊन जीप 200 फूट खोल दरीत गेली. ही घटना रात्री उशिरा घडली.

चार दिवसापूर्वीच 40 मजुरांना घेवून निघालेला टेम्पोला तापोळ्याजवळच अपघात झाल्याची घटना ताजी असताना आता बोलरो जीप दरीत कोसळल्याची घटना घडली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणाऱ्या बोलरो जीपचा अपघात झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात श्रीकांत  बावळकर, विजय मरे, सूरज घाडगे अशी जखमीची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांनाच्या मदतीने जखमींना बाहेर काढले आहे.

जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी वाई येथे पाठविण्यात आले आहे. या मध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असुन एकाच पाय फ्रॅक्चर झाला आहे व एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.