मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप आमदारांना त्याग करावाच लागेल!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन एक वर्ष उलटले असून त्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे वर्षभरापासून मंत्रिपदासाठी असलेली प्रतीक्षा सर्वच शिंदे गटातील आमदार करत होते.
त्यातच अजित पवार गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळ समावेश झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमधील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. याच मुद्दयावरून दोन आमदारांत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांची नाराजी असल्याची चर्चा समोर आलेली आहे.
अशात यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपचे नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. येत्या काळात त्यागाची तयारी ठेवा, हे यापूर्वीच सांगितलं होतं. येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी झोकून देऊन काम करा. येणारा काळ आपलाच असेल याची खात्री देतो.' असं म्हणत त्यांनी आपल्या नाराज आमदारांना चुचकारण्याचा देखील प्रयत्न यावेळी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.