Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धक्कादायक : पोलिसाचाच महिला पोलिसावर बलात्कार! सांगलीतील घटना : संशयिताला अटक, दोघांवर गुन्हा दाखल

धक्कादायक : पोलिसाचाच महिला पोलिसावर बलात्कार!
सांगलीतील घटना : संशयिताला अटक, दोघांवर गुन्हा दाखल



सांगली : खरा पंचनामा

सांगलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग तीन महिने विविध ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणारा पोलिसच असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्या पोलिसासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पोलिसाला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शुक्रवारी मध्यरात्री विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसीम शब्बीर ऐनापुरे (वय ३५), शब्बीर महबूब ऐनापुरे (दोघेही रा. सह्याद्रीनगर, संजयनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील वसीम ऐनापुरे हा पोलिस बॅंड पथकात असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पिडित महिला पोलिसाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वसीम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दि. ४ मार्चपासून दि. ६ जुलैपर्यंत सिंधुदुर्ग अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर येथे नेऊन तिच्या इच्छेविरूद्ध, जबरदस्तीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामध्ये ती गर्भवती राहिली आहे. 

पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्याही खायला घातल्या. याबाबत पिडितेने तक्रार करू नये साठी वसीम याच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरून धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात वसीम याने वापरलेली एक चारचाकी गाडी आणि दुचाकीचा पोलिस शोध घेत आहेत.   

धर्म परिवर्तनासाठी दबाव, दोन पगारवाढ रोखल्या
दरम्यान पीडितेने काही दिवसांपूर्वी वसीम हा धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याची लेखी तक्रार वरीष्ठ आधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर वसीम याच्या दोन पगारवाढ रोखण्यात आल्याचेही समजते. 

डीएनए चाचणीसाठी घेतले नमुने
दरम्यान पीडित गर्भवती असल्याने तिचे आणि संशयित वसीम याचे रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.