Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रजा न दिल्याने महिलेने चक्क मॉलमध्ये लावली आग!

रजा न दिल्याने महिलेने चक्क मॉलमध्ये लावली आग!मुंबई : खरा पंचनामा

आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने सुट्टी न दिल्याने संतप्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याने एक संतापजनक कृत्य केल्याची घटना भाईदरमध्ये घडली आहे. या संतप्त महिला कर्मचारीने भाईदरच्या डी-मार्टमध्येच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय महिलेवर भाईदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही तरुणी भाईदर पश्चिमेच्या मुख्य डीपी रोडवरील डी मार्टमध्ये कामाला होती. तिला काही महत्वाच्या कामासाठी सुट्टी हवी होती मात्र व्यवस्थापनाकडून सुट्टी नाकारण्यात येत होती. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून नाराज होती. तिने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला. मात्र तिची सुट्टी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या भरात तिने हे कृत्य केले.

महत्त्वाचे काम असूनही आपल्याला सुट्टी मिळत नाही यामुळे त्या महिला कर्मचाऱ्याचा राग खूपच अनावर झाला होता. त्यामुळे या संतप्त महिलेने रागाच्या भरात डीमार्ट मधीलपहिल्या मजल्यावरील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागाला चक्क आग लावली. आग लागल्याने डी मार्ट मध्ये एकच घबराट पसरली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत सुमारे २० हजाराचे नुकसान झाले आहे. 

या प्रकरणी स्टोर व्यवस्थापक यांनी भाईदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकारामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.